पिंपरी चिंचवड महापालिकेचे राजीव गांधी माध्यमिक विद्यालय नेहरूनगर येथे भरला ४१ वर्षांनी वर्ग…

Feb 13, 2025 - 09:33
Feb 13, 2025 - 09:34
 0  28
पिंपरी चिंचवड महापालिकेचे राजीव गांधी माध्यमिक विद्यालय नेहरूनगर येथे भरला ४१ वर्षांनी वर्ग…

पिंपरी चिंचवड महापालिकेचे राजीव गांधी माध्यमिक विद्यालय नेहरूनगर येथे सन १९८३ व १९८४ मध्ये इयत्ता दहावी बॅच चे विद्यार्थी - विद्यार्थीनी आणि शिक्षक यांचा स्नेहमेळावा शनिवार, दिनांक ०८/०२/२०२५ रोजी तब्बल ४१ वर्षांनी शाळेच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला जवळपास ९० विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाचे मागील सात ते आठ महिन्यांपासून हॉट्सअपच्या माध्यमातून सर्व वर्गमित्र व वर्गमैत्रिणीशी संपर्क साधून या स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या स्नेहमेळाव्याच्या कार्यक्रमास विविध जिल्यातून माजी विद्यार्थ्यांनी उपस्थित होत्या.

सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती. नलिनी जाधव होत्या. तसेच श्री. गोकुळ गायकवाड यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक केले.

महापालिकेच्या वतीने संत रविदास महाराज यांच्या जयंती निमित्त अभिवादन

माजी शिक्षकांपैकी श्रीम. सुलभा साळवी मॅडम, श्रीम. हरिश्चंद्र मचाले सर, श्री. नारायण थिटे सर, श्री. गोविंद चितोडकर सर, श्री. रामदास शिंगाडे सर, श्रीम. पार्वती भोसले मॅडम आणि श्रीम. टिपरे मॅडम या सर्व माजी शिक्षकांनी जुन्या आठवणींना उजाळा देऊन मार्गदर्शन केले. जे-जे विद्यार्थी उच्च पदावर कार्यरत आहेत, त्यामधील काही उद्योजक बनले आहेत आणि काहींनी स्वतःच्या शिक्षण संस्था काढल्या आहेत यांचा आम्हा सर्व शिक्षकांना सार्थ अभिमान वाटतो आहे असे सर्वांचे कौतुक केले आणि भरभरून आशिर्वाद दिला.

सदरप्रसंगी माजी विद्यार्थी व विद्यार्थीनी यांनी आपली मनोगते व्यक्त केली. अनेक विद्यार्थी व विद्यार्थीनी यांनी विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे व ताठ मानेने समाजात वावरताना एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

श्री. राम मेमाणे, श्री. सुभाष ढेरे, श्री. मनोज ढेरंगे व अभिनेते श्री. काळूराम ढोबळे यांनी जुन्या मराठी व हिंदी गाणी गाऊन  आपली कला सादर केली व कार्यक्रमात रंगत आणली.

कार्यक्रमाचे नियोजन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे कामगार नेते श्री. नितीन समगीर, श्री. गोकुळ गायकवाड, श्री. संजय चव्हाण, श्री. रोहिदास गव्हाणे, श्री. संजय काळभोर, श्री. मुबारक पानसरे, श्री. दिलीप शिंदे, श्रीम. नंदा ढेरे, श्रीम. आशा साळवी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयातील सध्याच्या शिक्षिका श्रीम. वैशाली शेलार व श्रीम. वर्षा हडपसरकर यांनी केले तर आभार श्री. नितीन सामगिर यांनी मानले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow