पावनथडी मेळा २०२४-२५: महिला आणि बाल कल्याणासाठी नवीन उपक्रम
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत स्वावलंबनाचा मोठा उत्सव होणार आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या समाज विकास विभागामार्फत दरवर्षी प्रमाणे महिला व बालकल्याण योजनेअंतर्गत पवनाथडी जत्रेचे आयोजन दि.२१/०२/२०२५ ते दि.२४/०२/२०२५ या कालावधीत, पी.डब्ल्यू.डी.मैदान, नवी सांगवी, पुणे - २७ येथे करणेत आलेले आहे.
त्याअनुषंगाने पवनाथडी जत्रेकरीता महिला बचतगटांकडून दि.०३/०२/२०२५ ते दि.१३/०२/२०२५ या कालावधीत प्रदर्शनामध्ये सहभाग घेणेकामी महिला बचतगटांकडून महानगरपालिकेमार्फत विहित केलेल्या कालावधीत अर्ज मागविण्यात आलेले आहेत. यामध्ये बचतगटातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तू विक्रीचे ४०२ स्टॉल, महाराष्ट्रीयन मराठमोळ्या शाकाहारी पदार्थांचे २९५ स्टॉल, तर मांसाहारी पदार्थाचे १७३ तसेच दिव्यांग बचतगटांना ०४, सामाजिक संस्था ०६, तृतीयपंथी बचतगट ०३ असे एकूण ८८३ इतकी सहभागी स्टॉलची संख्या आहे.
चिंचवड मतदारसंघातील विकास कामांसाठी पालिका अंदाजपत्रकात भरीव तरतूद करा - आमदार शंकर जगताप
त्यास अनुसरुन वार - सोमवार १७/०२/२०२५ रोजी वेळ सकाळी ११.०० वा. बचतगटांतील महिलांसमक्ष मा.स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, पिंपरी चिंचवड महानगरपालिका मुख्य इमारत, पिंपरी-१८ याठिकाणी मागणी केलेल्या बचतगटांना सोडत पध्दतीने (लकी ड्रॉ) स्टॉलचे वाटप करणेत येणार आहे.
तरी पवनाथडी जत्रेकरीता ज्या महिला बचतगटांनी अर्ज केलेला आहे, त्या सर्व बचतगटांतील महिलांनी सदर लकी ड्रॉ करीता वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.
What's Your Reaction?