वाहन चोरीच्या वाढत्या समस्येला आळा घालण्यासाठी ठोस पावले
२,२०,००० रुपये किमतीच्या चार दुचाकी जप्त, चार गुन्हे उघडकीस

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत वाहनचोरीचे वाढते प्रमाण लक्षात घेता मा. मा. पोलीस आयुक्त साो, विनयकुमार चौबे साो, यांनी सर्व गुन्हे शाखेना मोटारसायकल चोरीच्या गुन्हयांना आळा घालण्यासाठी प्रभावी उपाय योजना राबवुन मोटारसायकल चोरीच्या गुन्हयांना आळा घालणे बाबत व घडलेले गुन्हे उघडकीस आणणे बाबत आदेशित करण्यात आले होते. त्या अनुषागाने गुन्हे शाखा, युनिट-४ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अविंद पवार यांचे मार्गदर्शनाखाली पोउनि मुयुरेश साळुंखे, नारायण जाधव, पोलीस अंमलदार संजय गवारे, आदिनाथ मिसाळ, तुषार शेटे, प्रविण दळे व अमर राणे असे वाहन चोरीचे गुन्हयांचे अनुषंगाने समांतर तपास करत असताना. सहा. पो.उप.नि. नारायण जाधव व पो.शि.१९७७ अमर राणे यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की वाहनचोरीचे गुन्हे करणारा आरोपी नामे पंकज हरिप्रसाद बाजुळगे हा साहिल एलिगन्स सोसायटी समोर, डि मार्ट मागे, थेरगाव, पुणे येथे थांबला असुन त्याचेकडे होंडा स्प्लेंडर मोटारसायकल आहे, सदर मोटारसायकल चोरीची असण्याची दाट शक्यता आहे, अशी बातमी मिळाल्याने पंकज हरिप्रसाद बाजुळगे वय-२७ वर्षे रा. रुद्र कॉलनी, जिवनज्योती हॉस्पिटलचे बाजुला, रहाटणी, पुणे यास दुचाकीसह नागरीक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम ३८ (१) (ड) अन्वये ताब्यात घेतले. सदर आरोपी हा अभिलेखावरील वाहनचोरीचे गुन्हे करणारा आरोपी असुन त्याचेकडे मिळुन आलेल्या दुचाकीबाबत कौशल्यपुर्ण तपास केला असता त्याचे ताब्यात मिळालेली दुचाकी हि काळेवाडी पोलीस स्टेशन हद्दीतुन चोरली असल्याचे निष्पन्न झाले तसेच त्याचेकडुन वाकड पोलीस स्टेशन हद्दीतुन चोरलेल्या ०३ दुचाकी ( ०२ स्पेंल्डर व ०१ डिओ मोपेड) जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपी इसम पंकज बाजुळगे याचेकडुन एकुण २,२०,०००/- रु कि च्या ०४ दुचाकी जप्त करण्यात आलेल्या असुन एकुण ०४ गुन्हे उघड झाले आहे. त्यास पुढील कारवाई कामी काळेवाडी पोलीस स्टेशन यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
आरोपी इसम पंकज बाजुळगे याचेकडुन एकुण २,२०,०००/- रु कि च्या ०४ दुचाकी जप्त करण्यात आलेल्या असुन एकुण ०४ गुन्हे उघड झाले आहे. त्यास पुढील कारवाई कामी काळेवाडी पोलीस स्टेशन यांचे ताब्यात देण्यात आले आहे. अटक आरोपी पंकज बाजुळगे यांचे कडुन खालील प्रमाणे गुन्हे उघडकिस आणले आहेत. १) काळेवाडी पोलीस स्टेशन गु. र. नं. ५०/२०२५ भा.न्या.सं. कलम ३०३(२) २) वाकड पोलीस स्टेशन गु.र.नं. १०६६/२०२४ भा.न्या.सं. कलम ३०३ (२) ३) वाकड पोलीस स्टेशन गु.र.नं. ७६४/२०२४ भा.दं. वि. कलम ३७९, ४) वाकड पोलीस स्टेशन गु.र.नं.१०३९/२०२४ भा. न्या.सं. कलम ३०३ (२) सदरची कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त मा. श्री. विनयकुमार चौबे साो, पोलीस सह आयुक्त मा. श्री. डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त मा. श्री. वसंत परदेशी साो, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे श्री. संदिप डोईफोडे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे-१ मा. श्री. विशाल हिरे साो यांचे मार्गदर्शनाखालील गुन्हे शाखा, युनिट-४, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, पोलीस उपनिरीक्षक मयुरेश साळुंखे, नारायण जाधव, पोलीस अंमलदार संजय गवारे, आदिनाथ मिसाळ, रोहिदास आडे, प्रविण दळे, तुषार शेटे, मोहम्मद गौस रफिक नदाफ, सुरेश जायभाये, दिनकर आडे, वासुदेव मुंडे, सुनिल गुट्टे, धनाजी शिंदे, गोविंद चव्हाण, सुखदेव गावंडे, प्रशांत सैद, अमर राणे यांनी केली आहे.
What's Your Reaction?






