भारतीय योग संस्थानच्या काळेवाडी - पिंपरी जिल्ह्याच्या वतीने शनिवार दि. ०१/०२/२०२५ रोजी काळेवाडी येथील बालाजी लॉन्स येथे अर्ध दिवसीय योग शिबिर उत्साहात संपन्न झाले. या शिबिरामध्ये ८०० पेक्षा अधिक साधकांनी सहभाग घेतला. भारतीय योग संस्थानचे अखिल भारतीय प्रांत प्रधान आदरणीय देसराज सर यांनी सदर शिबिरामध्ये मार्गदर्शन केले, सध्या हाडांची समस्या हा एक गंभीर विषय झाला आहे त्याच्यावर योगद्वारे कसे निदान होईल यावर अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आदरणीय देसराज सरांनी सांगितली आहे त्याचप्रमाणे योग केल्याने आपल्याला काय फायदे होतात याची माहिती दिली आहे.या वेळी अखिल भारतीय महामंत्री ललित गुप्ता सर, महाराष्ट्र प्रांतप्रधान अशोक बसेर सर, विभागीय प्रधान भाग्यश्री बसेर उपस्थित होते.
सदर शिबिराचे नियोजन पिंपरी काळेवाडी शिबीर प्रमुख संजीवनी देशमुख व प्रतिभा पाटील मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
त्यांना काळेवाडी व पिंपरी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेऊन शिबिर उत्तम पार पाडण्यासाठी सहकार्य केले. उत्तम नियोजनबद्ध शिबिराचा सर्वांनी लाभ घेतला.