सर्वांग सुंदर, सर्वोत्तम भारत हाच महाराष्ट्राचा ध्यास - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला दिल्या शुभेच्छा

TDNTDN
Jan 26, 2025 - 10:13
Jan 26, 2025 - 10:14
 0  5
सर्वांग सुंदर, सर्वोत्तम भारत हाच महाराष्ट्राचा ध्यास - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि.२५:- सर्वांग सुंदर, सर्वोत्तम भारत घडविणे हा महाराष्ट्राचा ध्यास आहे. त्यासाठी निर्धार करूया, असे आवाहन करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला शुभेच्छा दिल्या आहेत.

मुख्यमंत्री संदेशात म्हणतात, 'महाराष्ट्र हे भारताचे 'पॉवर हाऊस' आहे. आगामी काळात 'डेटा सेंटर'चे 'कॅपिटल' होणार आहे. आपले एमएमआर क्षेत्र जागतिक 'ग्रोथ सेंटर' होणार आहे. जागतिक गुंतवणूकदार आणि उद्योग क्षेत्रासाठी महाराष्ट्र 'मॅग्नेट' आहे. या सगळ्या शक्तिस्थळांमुळे महाराष्ट्राचे भारतीय अर्थव्यवस्था शक्तिशाली करण्यात अनन्य साधारण योगदान राहणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र आता थांबणार नाही. शेती - सिंचन, शिक्षण, आरोग्य, उद्योग- ऊर्जा यांसह पायाभूत सुविधा क्षेत्रांत महाराष्ट्राने आतापर्यंत नेत्रदिपक कामगिरी केली आहे. सामाजिक न्यायाच्या बाबतीत ही महाराष्ट्राने अव्वल स्थान राखले आहे. पर्यावरण आणि वातावरणीय बदलात समतोल राखण्याचे भान- संवेदना जतन केली आहे. महाराष्ट्राचा हाच लौकीक आपल्याला वाढवायचा आहे.

पद्म पुरस्कार २०२५: प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला दिग्गजांचा सन्मान

त्यासाठी एकजूट करायची आहे.आपले भारतीय प्रजासत्ताक आणखी बलशाली करायचे आहे. त्यासाठी सर्व भेद बाजूला ठेवून, परस्पर स्नेह, सौहार्द वाढवूया. सर्वश्रेष्ठ, सर्वांग सुंदर आणि सर्वोत्तम भारत घडविण्याचा संकल्प करूया. आपल्या पुर्वसुरींना दिलेला राष्ट्रप्रेमाचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा निर्धार करूया असे आवाहन करून, मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी राज्यातील जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow