पिंपरी चिंचवड महापालिकेची साप्ताहिक स्वच्छता मोहीम
स्वच्छतेसाठी महापालिका उप आयुक्त आघाडीवर

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका स्वच्छ भारत अभियान अंतर्गत साप्ताहिक स्वच्छता मोहीम राबवत असून स्वच्छता सर्वेक्षण २०२४ साठी महापालिकेने जोरदार तयारी केली असून आठवड्यातील प्रत्येक शनिवारी पालिका विविध सार्वजनिक स्वच्छता मोहीम राबवत आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून १५ फेब्रुवारी २०२५ रोजी 'अ' क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत प्रभाग क्रं १४ मधील खंडेराया भाजी मंडई, आकुर्डी येथे भाजी मंडई तसेच सार्वजनिक ठिकाणे व मुख्य चौकांची स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेचे आणखी एक वैशिष्टय म्हणजे या स्वच्छता मोहिमेमध्ये खंडेराया भाजी मंडई व त्यापासून दोनशे मीटर अंतर भागात प्लेगेथॉन देखील घेण्यात आले.
वन्य प्राण्यांचे हल्ले कमी करण्यासाठी नवीन उपक्रम
यावेळी भाजी मंडईतील व्यापारी व गिऱ्हाईकांना स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यात आले. त्याच बरोबर कचरा विलगीकरण कसा करावा, चार डस्टबिनचा वापर, प्लास्टीक बंदी विषयी माहिती देण्यात आली. कचरा महापालिका घंटा गाडीतच टाकावा तसेच, शाळा, सार्वजनिक ठिकाणे, परिसर स्वच्छता कशी राखावी. याच बरोबर स्वच्छ सर्वेक्षण २०२४ विषयी यावेळी माहिती देण्यात आली.
या स्वच्छता मोहीम मध्ये ओंजळ फाउंडेशनकडून "पिशवी आमची किंमत तुमची" या घोषवाक्य द्वारे ‘प्लास्टिक पिशवी’चा वापर टाळा आणि ‘कापडी पिशवी’चा वापर करा असे आवाहन उपस्थित नागरिकांना या वेळी करण्यात आले तसेच, पिंपरी चिंचवड शहराला “स्वच्छ सर्वेक्षण २०२४” मध्ये अव्वल शहर बनविण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेला सर्वातोपरी सहकार्य करण्याचे आवाहन देखील यावेळी करण्यात आले.
यावेळी पिंपरी चिंचवड महापालिका उपायुक्त सचिन पवार, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, सहाय्यक आरोग्य अधिकारी राजू साबळे, आरोग्य निरीक्षक विकास शिंदे, महापालिका अधिकारी, कर्मचारी, ओंजळ फाउंडेशन, एन एस एस विद्यार्थी प्रतिभा कॉलेज ऑफ एज्युकेशन, नवी दिशा महिला बचत गट, आपुलकी ज्येष्ठ नागरिक संघ, प्रभाग क्रमांक चौदा मधील नागरिक हे ही यावेळी उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड शहर कचरामुक्त करण्यासाठी आरोग्य विभागाकडून साप्ताहिक स्वच्छता मोहीम राबविण्यात येत असून या सार्वजनिक स्वच्छता मोहिमेत नागरिकांनी देखील मोठ्या प्रमाणात सहभागी होवून पिंपरी चिंचवड महापालिकेस सहकार्य करावे.
-सचिन पवार
उप आयुक्त आरोग्य विभाग
पिंपरी चिंचवड महानगर पालिका
What's Your Reaction?






